पाल (ता. रावेर) प्रतिनिधी – जनकल्याण आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूल, पाल (ता. रावेर, जि. जळगाव) येथे तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन चिनावल येथील शेख इरफान (मेंबर) यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अफजलखान समद खान, गावातील मान्यवर हुसेन उघडू, ग्रामपंचायत सदस्य उमर रमजान तडवी, मो. इसहाक, अंशकालीन शिक्षक शेख युनूस, साबीर इदवार तडवी, अमित कादर लोहार, सबाज जोहर तडवी, आबिद हकीम लोहार आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक सय्यद सईद सर, शिक्षक एजाज सर, नवीद सर, आसिफ सर, सुमय्या मॅडम, वसीम सर, इमरान सर, जुबेर सर, हकीम सर, लिपिक अय्युब वजीर तडवी यांच्यासह शेख जाकीर, शेख गनी, सलमान खान, शफी खान, जुम्मा बशीर तडवी तसेच शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, आरोग्यदायी स्पर्धा वृत्ती आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.





