अमळनेर – अमळनेर-धुळे रस्त्यावर आयडीएफसी बँकेसमोर नेहमीच अवैध पार्किंगने रस्ता गिळंकृत केलेला असतो अनेक दिवसांपासून या अवैध पार्किंगकडे दुर्लक्ष केलेल्या अमळनेर ट्रॅफिक पोलिसांनी मंगळवारी कारवाईचे धाडस दाखवले त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, मात्र त्यात सातत्य हवे असे नागरिकांचे मत व्यक्त होत आहे.
अमळनेर-धुळे रस्त्यावर बस स्थानकापासून थेट आर.के.नगरपर्यंत तर बसस्थानकापासून थेट दगडी दरवाजापर्यंत ठिक ठिकाणी अवैध पार्किंगने रस्ता अक्षरशः गिळला आहे. मात्र पालिका आणि वाहतूक पोलीसदेखील याकडे डोकेझाक करत असतात, वाहनांच्या रहदारीला या अवैध पार्किंगमुळे अडथळा येतो, मात्र वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेतात. आयडीएफसी बँकेलगत असणाऱ्या दवाखान्यासमोरदेखील रस्त्यावर अवैध पार्कीगचे वाहने उभी होती, मात्र वाहतूक पोलिसांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे ज्या वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली त्यांनी नापसंती व्यक्त केली आहे. तेव्हा वाहतूक पोलिसांनी एकही ठिकाणी अवैध पार्किंग केली जाणार नाही. यासाठी कारवाईचा धडाका सुरुच ठेवावी, अशी मागणी होत आहे.