फत्तेपूर : फत्तेपूर शहरात ग्रामसभा उत्साहात पार पडली. ग्रामसभेत गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वच्छता अभियान व शुद्ध पाणी उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांनी एकत्र येऊन गाव नेहमी स्वच्छ व निरोगी ठेवण्याचा संकल्पही यावेळी शपथ घेऊन केला.
या ग्रामसभेत तलाठी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सभेदरम्यान ग्रामपंचायतीच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. गावकऱ्यांनी या वेळी आपल्या समस्या मांडल्या, तर शेतकऱ्यांनी विशेषतः रस्त्यांची दुरुस्ती व नवीन रस्त्यांची मागणी तलाठी साहेबांकडे केली.
ग्रामसभेचा कार्यक्रम सामूहिक सहभागातून यशस्वीपणे पार पडला असून, गावातील स्वच्छता व विकासाबाबत ग्रामस्थांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे उपस्थितांनी नमूद केले.