मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत काही अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे उघड झाल्यानंतर राज्य सरकारने सर्व लाभार्थींना ई-केवायसी अनिवार्य केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.
“योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी लाडकी बहीण पोर्टलवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्व पात्र भगिनींनी पुढील २ महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा लाभ मिळणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ई-केवायसी कशी करावी?
-
लाडकी बहीण पोर्टलवर लॉगिन करून नाव, पत्ता, आधार, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला आदी माहिती भरावी
-
आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड कराव्यात
-
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ई-केवायसी नोंदणी मान्य होईल
ई-केवायसी न केल्यास परिणाम
-
ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही
-
दरमहा मिळणारी ₹१५०० ची आर्थिक मदत बंद होईल
सरकारने सर्व लाभार्थींना तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.





