बिहारच्या महिलांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ या नव्या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास ७५ लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये थेट जमा करण्यात येणार आहेत. यासाठी अंदाजे ७ हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला या योजनेचा लाभ मिळणार असून, त्या महिलेला स्वतःच्या आवडीनुसार रोजगार किंवा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. प्रशासनाच्या मते, महिलांच्या सबलीकरणासाठी ही योजना एक वेगळे पाऊल ठरणार आहे.





