जामनेर – महिलांनी स्वतःच्या आरोग्याचा विचार करावा. मासिक पाळी शाप नसून वरदान आहे सर्व मुली व महिलांनी मासिक पाळी बद्दल मोकळे बोलावे. मासिक पाळी लाज नसून अभिमान बाळगावा. असे प्रतिपादन जि.प.च्या मुख्य कार्य कारी अधिकारी मीनल करणवाल यांनी शेंदुर्णी येथे केले.
सेवापंधरवडा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जल्म दिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत जामनेर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महिलांचे सशक्तीकरण करणे व त्यांना उत्तम प्रकारे आरोग्य सेवा देणे या उद्देशाने स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत आज शेंदुर्णी येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छता याविषयी मागदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मीनल करणवाल बोलत होत्या. यावेळी किशोर वयीन मुलींना मान्यवरांच्या हस्ते सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि.प.सदस्य संजयदादा गरुड तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषद जळगांव च्या मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, मुख्याधिकारी शेंदुर्णी नगर परिषद विवेक धांडे, इंडियन डेंटल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. आशिष महाजन, गोदावरी मेडिकल कॉलेजचे डॉ. जतिन बाविस्कर, ज्येष्ठ नेते गोविंद अग्रवाल, यू.यू. पाटील, सागरमाल जैन, दीपक गरुड, उत्तम थोरात, प्रकाश झंवर, वामन फासे, युवा नेते स्नेहदीप गरुड उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहितकुमार जोहरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.जे. पाटील यांनी केले. महिला आरोग्य अधिकारी डॉ. पल्लवी राऊत यांनी उपस्थित किशोर वयीन मुलींना मासिक पाळीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. आदित्य पाटील, डॉ. श्रद्धा पाटील, गजानन माळी, राजश्री पाटील, सूर्यभान पाटील, विजया पाटील, अनुरथ रहाडे, योगेश पाटील, सुधाकर माळी, संयम हिवाळे, दीपक मोरे, ईश्वर कोळी, मंजू जवळे, रेखा इंगळे, विजय बेलदार यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.




