गेल्या काही दिवसांपासून राज्यात सक्रिय झालेल्या पावासाने सर्वांचीच दणादाण उडवून दिली. राज्यातील मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि सर्वच ठिकाणी पावसाने जोरदार बँटिग केली. पावसामुळे नद्यां आणि नाल्यांना पूर आल्याने गावच्या गाव पाण्यात गेली. आता मागच्या दोन ते दोन तीन दिवसापासून पाऊसाने उसंती घेतली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अॅाक्टोबर महिन्यातही पाऊस असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. पण पाऊस थांबणार कधी याबाबत विचारणा केली जात होती. अखेर लवकरच पाऊस निरोप घेणार असल्याची एक मोठी अपडेट समोर आली आहे.
या तारखेपासून पाऊस निरोप घेणार
यंदा सर्वाधिक पाऊस हा मराठवाड्यात झाला. सप्टेंबर महिन्यात येथे तब्बल ११५ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. आज देखील विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात आज तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, 7 ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होणार आहे. तर 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज ‘या’ जिल्ह्यात पाऊस पडू शकतो
विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाची जोरदार शक्यता आहे. परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून येथे तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.





