फत्तेपुर – दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि जयघोषात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सौ. पुष्पाताई पुना शेजुळे आणि फत्तेपुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अंकुश जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन, धूपारती आणि महामानवांचे पूजन पार पडले.
यानंतर पंचक्रोशीतील उपस्थित बौद्ध उपासक-उपासिकांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्ममार्गाचा संकल्प केला. या निमित्ताने मान्यवरांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला सरपंच सौ. पुष्पाताई पुना शेजुळे, सरपंचपती श्री. पुनाजी शेजुळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. अंकुश जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे, जिल्हा उपाध्यक्ष वसंत जगन लोखंडे, तालुका उपाध्यक्ष माणिकराव लोखंडे, माजी तालुकाध्यक्ष नंदबोधित तायडे, तालुका सचिव मुकुंद सोमवंशी यांसह परिसरातील असंख्य बौद्ध अनुयायी उपस्थित होते.





