यावल – जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे आज दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत “तंबाखूमुक्त अभियान ३.०” राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी केले.
या प्रसंगी सर्व स्वयंसेवकांनी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर न करण्याची आणि समाजात तंबाखूमुक्तीबाबत जनजागृती करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमात स्वयंसेवकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.





