• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

वेगाचा मोह ठरला जीवघेणा : बाईक झाडावर आदळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू

मामलदे फाट्याजवळ चोपडा तालुक्यातील हृदयद्रावक अपघात

vyaghra shuryam by vyaghra shuryam
October 17, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या
0
वेगाचा मोह ठरला जीवघेणा : बाईक झाडावर आदळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू
बातमी शेअर करा !

चोपडा – चोपडा तालुक्यातील मामलदे फाट्याजवळ बुधवारी (दि. १६ ऑक्टोबर) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला. यामाहा स्पोर्ट्स बाईकवरील नियंत्रण सुटल्याने बाईक झाडावर आदळली आणि दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये मामलदे येथील अमोल ज्ञानेश्वर पाटील (२५) आणि पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (२३) या दोघांचा समावेश आहे. दोघे एकाच दुचाकीवरून मामलदेहून चोपड्याकडे येत होते. मामलदे फाट्याजवळ पोहोचताच बाईकवरील ताबा सुटल्याने ती झाडावर जोरदार आदळली. दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

अपघातानंतर नातेवाईकांनी तत्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेले, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्ना पाटील यांनी तपासल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. यामुळे रुग्णालयात हृदयद्रावक वातावरण निर्माण झाले.

मयत पृथ्वीराज पाटील हा सुरत येथे कापड व्यवसायात कार्यरत होता. दसऱ्याच्या निमित्ताने तो नुकताच घरी आला होता. त्याने अलीकडेच नवीन यामाहा स्पोर्ट्स बाईक खरेदी केली होती. तर अमोल पाटील हा बियाणे कंपनीत नोकरीला होता आणि त्याचे लग्न ठरले होते. लग्नाच्या तयारीत असतानाच हा अनर्थ ओढवला.

दोघेही आपल्या कुटुंबातील एकुलते एक असल्याने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पृथ्वीराज सोशल मीडियावर ‘रील्स स्टार’ म्हणून ओळखला जात होता. त्यांच्या पश्चात आई-वडील व एक बहिण असा परिवार आहे.

अपघाताची माहिती मिळताच आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी रुग्णालयात भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच अरुणभाई गुजराथी, कैलास पाटील, नरेंद्र पाटील, शशिकांत पाटील, देवेंद्र पाटील, शुभम चौधरी यांसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

मयत दोघांवर १७ ऑक्टोबर रोजी मामलदे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, या घटनेमुळे मामलदे आणि चोपडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
यावल तालुक्यात ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींसमोर अडचणींचा डोंगर

यावल तालुक्यात ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींसमोर अडचणींचा डोंगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News