रावेर – येथील पुरवठा निरीक्षक कुमारी डाळिंबी सरोदे यांनी मागील वर्षात दिलेल्या MPSC परीक्षेचे नुकतेच निकाल जाहीर झाले असून कुमारी डाळिंबी सरोदे उत्तम रँक मिळवून राजपत्रित अधिकारी पदाला गवसणी घातली
याबाबत असे की महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षक पदाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन आपली पहिलीच पोस्टिंग म्हणून रावेर येथे नुकतेच एक वर्षांपूर्वी पुरवठा अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या पुरवठा निरीक्षक अधिकारी कु. डाळिंबी रवींद्र सरोदे यांनी मागील 2024 वर्षात पब्लिक सर्विस कमिशन MPSC परीक्षा दिली असून त्या झालेल्या MPSC परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झालेले असून त्यामध्ये रावेरच्या पुरवठा निरीक्षक कु.डाळिंबी सरोदे यांची राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती झाली
रावेर तालुक्यातील मुळगाव रोझोदा या गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, कुमारी डाळिंबी सरोदे यांचे १ ते ४ थी चे प्राथमिक शिक्षण आपले मूळ गावी रोझोदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले असून उच्च शिक्षण हे धनाजी नाना महाविद्यालयात पूर्ण करून पुढील डिग्री शिक्षणासाठी त्यांनी आपले डिग्री शिक्षण B TECH हे राहुरी विद्यापीठ अहिल्यानगर येथे पूर्ण करून शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न, व जिद्द कायम ठेऊन राज्य शासनाच्या विविध पदाच्या परीक्षा देऊन विविध परीक्षांमध्ये , यशस्वी कामगिरी केलेली असूज त्यात मंत्रालयातील क्लास ३ परीक्षा, टॅक्स असिस्टंट परीक्षा, कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी परीक्षा, तलाठी परीक्षा, पुरवठा निरीक्षक इ राज्य शासनाच्या विविध परीक्षा देऊन त्यात यश संपादन केलेले आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपल्या वडिलांचे व परिवारांचे नावलौकिक केले.
अशा या वयाच्या 24 व्या वर्षी राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या सरोदे मॅडम यांचा सत्कार करताना रेशन दुकानदार संघटना तसेच पुरवठा निरीक्षण अधिकारी माननीय विवेक शिरेकर साहेब, गोदामपाल हर्षल पाटील सर, मुळे साहेब तालुका टेक्निशियल इंजिनिअर मोसीम सैय्यद व सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
त्यांचे या निवडीबद्दल तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आदरणीय श्री बंडू कापसे साहेब यांनी अभिनंदन केले💐💐💐💐





