यावल – आगामी जिल्हा हिंगोना, सावखेडा सिम,गटात राजकीय हालचालींना मोठा वेग आला असून जिल्हा . परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोणा
या गटात अनेक दिग्गजंनी बाशिंग बांधले असून आदिवासी युवा नेत्यांनी उमेदवारीसाठी धड पड सुरू केली असल्याचे दिसून येते,
उस्मान रमजान तडवी हे मागील काही वर्षांपासून समाजकारण, आदिवासी बांधवाच्या जनहिताच्या मुद्यावर वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले असून अनेक आदिवासी भागांमध्ये शैक्षणिक व सामाजिक
उपक्रम राबविले आहेत. ग्रामीण भागातील तरुणांना संघटित करून त्यांच्यात सामाजिक जागृती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. स्थानिक पातळीवर त्यांच्या या कार्यामुळे त्यांना बराच प्रतिसाद मिळत असून गटातील तरुण मतदार युवक उस्मान तडवी यांना पसंती देत आहे,. समाजातील
मागासवर्गीय आणि आदिवासी घटकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. आमच्या भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शिक्षण, रोजगाराच्या संधी वाढविणे हेच माझे प्रमुख ध्येय आहे. समाजासाठी
सकारात्मक बदल घडविण्यासाठी तरुण तड्पदार चेहरा असून उस्मान रमजान तडवी काँग्रेस पक्षाचे अकनिष्ठा वंती व सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी विरोधी पक्षाला अनेक वेळा सामोरे जाऊन सत्याला वाचा फोडण्याचे काम त्यांनी अनेक वेळा केले आहे,
हिंगोणा-सावखेडा गटात यंदा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाले असल्याने या गटात अनेक नवीन चेहरे पुढे येत आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे असून काँग्रेस पक्षाने उस्मान तडवी यांना तिकीट दिल्यास भरघोस मतांनी नक्कीच विजयी होऊन दाखवणार असे मत उस्मान रमजान तडवी यांनी व्यक्त केले,
शेवटून पक्ष श्रेष्टी जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील,,





