चोपडा – दि.२१(प्रतिनिधी)शिवसेना शिंदे गटाचे तरूण तडफदार कार्यकर्ते तथा मुस्लिम समाजाचे उभरते युवा नेतृत्व सय्यद मजहर सय्यद जहांगीर यांनी आमदार प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या शब्दाला मान देत वार्ड क्रमांक सहा मधून आपली उमेदवारी मागे घेत आमदारांची शाब्बासकीची थाप मिळविली आहेअसे परखड मत अल्पसंख्यांक समाज युवा कार्यकर्ते सय्यद मजहर सय्यद जहांगीर यांनी झटपट पोलखोलशी बोलताना व्यक्त केले आहे.
सैय्यद मझहर या कार्यकर्त्याने गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून युवक जोडो अभियान , तळागाळातील कार्यकर्त्यांची रेशन कार्ड असो वा जन्म मृत्यू दाखला नोंदणी असो अशा सर्वच क्षेत्रात गोरगरीब जनतेच्या कामासाठी वेळ देण्याचा चांगलाच सपाटा लावला होता. विशेष करून अल्पसंख्यांक समाजासाठी जोरदार कार्य हाती घेतली होती. तसेच मजहर यांचे कार्य आधीपासूनच जोमात होते त्यामुळे त्यास शिवसेना शिंदे गटाचे मिडिया प्रसिद्ध प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली होती. त्यांच्या हुरहून्नरी कार्याने त्याची चांगली ओळख तयार झाली आहे. त्यामुळे त्यांनी प्रभाग नंबर ६ अ मधून अपक्ष नामांकन अर्ज भरून उमेदवारी दाखल केली आहे मात्र आमदारांनी नामांकन अर्ज मागे घेण्यास सांगितले असता त्यांनी शून्य मिनिटांत उमेदवारी मागे घेण्यास होकार देउन अण्णा साहेबांच्या शब्दाला मान दिला आहे. त्यामुळे आता प्रभाग क्रमांक ६मधील शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आसिफ सैय्यद व दीपाली विनोद चव्हाण यांचे प्रचारासाठीआपण कंबर कसणार असल्याची भूमिकाही सय्यद मजहर सय्यद जहांगीर यांनी स्पष्ट केली आहे.





