नाचनखेडा (ता. जामनेर) – नाचनखेडा समूह ग्रामपंचायतीत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला सरपंच हर्षल चौधरी, ग्रामसेवक कैलाश चौधरी, अधिकारी अजय बंजारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी संविधानातील मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.




