पाळधी ता. जामनेर प्रतिनिधी दिपक धनगर – जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल पाळधी ता. जामनेर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. शाळेच मुख्याध्यापिका सौ. वर्षा पाटील मॅडम यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेतील उपशिक्षक श्री. गोपाल माळी सर यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले व शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





