फत्तेपूर – फत्तेपूर जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत विद्यार्थ्यांच्या पोषणाच्या दृष्टीने केशर दूध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दूध वाटप कार्यक्रमावेळी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक साबीर सर, इम्रान खान, जुबेर शेख, आदिल सर तसेच इतर शिक्षकवर्ग उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत योग्य पोषणाचे महत्त्व पटवून दिले.
दूध वाटपानंतर विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील व्यायामाचे महत्त्व सांगण्यात आले तसेच काही मूलभूत व्यायामांचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढताना दिसली.
संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि आनंदी वातावरणात पार पडला.





