यावल प्रतिनिधी फिरोज तडबी – यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत अन्यत्याग उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अखेर सोमरसाने सांगत,
. आदिवासी बांधवांच्या मागण्यांवर आज महत्त्वाची बैठक पार पडली असून तहसीलदार मोहनमाला नाझिरकर व प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी थेट घेऊन सविस्तर चर्चा करून आंदोलन स्थळी मागण्या समजून घेऊन मध्यस्थी केली.
आंदोलकांनी गेल्या तीन दिवसांपासून प्रकल्प कार्यालयासमोर न्यायाच्या मागण्यांसाठी ठिय्या देत संघर्ष सुरू ठेवला होता. प्रशासनाची कुठलीही ठोस दखल न घेतल्याचा आरोप करत आंदोलन तीव्र होत असतानाच आज झालेल्या चर्चेनंतर उपोषणाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
तहसीलदार नाझिरकर यांनी आंदोलकांच्या मागण्या शासनापर्यंत त्वरीत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनीही आवश्यक प्रस्ताव व कागदपत्रे पुढे पाठवण्याबाबत सकारात्मक भूमिका स्पष्ट केली.
आंदोलकांनी “शासनाने लेखी हमी देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी केली तरच उपोषणाची पुनर्बहाली होणार नाही,” अशा शब्दांत इशारा दिला आहे. तात्पुरती स्थगिती जरी देण्यात आली असली तरी संघर्षाची ज्योत कायम असल्याचे संकेत त्यांनी दिले.सामाजिक कार्यकर्ते मुनाफ जुम्मा तडवी,सायसिंग बारेला यांच्यास अनेक उपोषण करते, सामाजिक कार्यकर्ते मनीष सर यांनी सुद्धा मोठे सहकार्य केले उपस्तितीत होते,
यावलमध्ये तीन दिवसांपासून पेटलेल्या असंतोषाच्या आंदोलना दौलतीला आता तात्पुरती विश्रांती मिळाली असली तरी आगामी दिवसांमध्ये प्रशासनाने घेतलेली पावले निर्णायक ठरणार आहेत.
यावेळी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्तित होते,




