यावल प्रतिनिधी फिरोज तडवी – यावल । केळी कापणीच्या कारणावरून झालेल्या वादातून ३० वर्षीय तरुणावर एकाने विड्याने तसेच लोखंडी हुकने हल्ला केला. ही घटना बुधवारी घडली होती. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरातील शेत शिवारात अरुण पाटील यांचे शेत गट क्रमांक २१८८ येथे आहे. या शेतात बुधवारी केळी कापणीसाठी मजूर गेले होते. तेथे केळी कापणी सुरू असताना शेख जुबेर शेख जहीर (वय. ३०, रा. आझाद नगर, यावल) या तरुणाला शोएब युसूफ कजबी उर्फ नकली (रा. सईद पुरा, यावल) याने शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच लोखंडी विडा तसेच लोखंडी हुकने त्याच्या डोक्यावर, पाठीवर मारून जबर दुखापत केली. या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल असून पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्य करीत आहे





