नाचणखेडा (ता. जामनेर) प्रतिनिधी – दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी जामनेर येथील ज़िकरा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये भोजन उत्सव (फूड फेस्टिव्हल) अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात व मोठ्या थाटामाटात पार पडला.
या कार्यक्रमास ज़िकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शेख रहिम सर, सचिव शेख जाकिर सर, शेख नईम सर, अकिल भाई, शाळा समितीचे सदस्य कमरुद्दीन जनाब, ऊर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक समीऊलरहेमान सर तसेच ज़िकरा इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक शेख शादाब अहमद सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भोजन उत्सवाचे उद्घाटन अध्यक्ष व सचिव यांच्या हस्ते रिबीन कापून तसेच केक कापून करण्यात आले. या उत्सवात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार करून विक्रीस ठेवले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व उद्योजकतेला वाव देणाऱ्या या उपक्रमास पालकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिरिन शेख यांनी केले, तर संपूर्ण आयोजनाची जबाबदारी काजल केतवास यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. या उपक्रमात मुख्याध्यापक शेख शादाब अहमद सर, शिक्षक पटेल मो. सादिक सर, शेख नदीम सर, जहिर खान सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
भोजन उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना व व्यावहारिक ज्ञान वाढीस लागल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.





