जळगाव – यावल तालुक्यात अलीकडेच घडलेल्या एका निरपराध बालकाच्या हत्येप्रकरणी समाजात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अमानवी व निंदनीय घटनेविरोधात सलमानी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास समिती गठित करावी व दोषींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून समाजात न्यायाची स्थापना होईल आणि भविष्यात कोणालाही अशा घृणास्पद कृती करण्याचे धाडस होणार नाही. संस्थेने पोलिस अधीक्षक, जळगाव यांना दिलेल्या निवेदनात प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करून तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.