भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने (RRB) सेक्शन कंट्रोलर या पदासाठी भरती जाहीर केली असून उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्जाची तारीख
अर्जाची सुरुवात : १५ सप्टेंबर २०२५
शेवटची तारीख : १४ ऑक्टोबर २०२५
फी भरण्याची शेवटची तारीख : १६ ऑक्टोबर २०२५
पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक
वयोमर्यादा : २० ते ३३ वर्षे (राखीव प्रवर्गांना सवलत)
अर्ज प्रक्रिया
अधिकृत संकेतस्थळावर (rrbapply.gov.in) लॉग इन करा.
नवीन अकाउंट तयार करून नोंदणी (रजिस्ट्रेशन) करा.
आवश्यक माहिती भरून अर्ज पूर्ण करा.
निर्धारित शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.
अर्ज शुल्क
सामान्य प्रवर्ग : ₹५००
राखीव प्रवर्ग : ₹२५०
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार असून त्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल.





