मुक्ताईनगर : बुधवार, दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुक्ताईनगर तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन मुक्ताईनगरचे लोकप्रिय आमदार चंदूभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना देण्यात आले.
या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की, तालुक्यात व शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे घर व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव पाठवून पीडितांना आर्थिक मदत मिळावी. या मागणीसाठी मुक्ताईनगर शिंदे गटाचे शहराध्यक्ष व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.