मुंबई : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेत मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेशावेळी विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती, उत्पन्नाचा दाखला आणि कागदपत्रेच पुढील शिक्षणकाळात शिष्यवृत्तीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी पुन्हा तीच माहिती सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले.
📌 काय होणार बदल?
-
प्रवेशावेळी सादर केलेली माहितीच शिष्यवृत्तीसाठी ग्राह्य धरली जाईल.
-
विद्यार्थ्यांना वारंवार उत्पन्नाचा दाखला व कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत.
-
अर्ज प्रक्रियेतील टप्पे कमी होऊन वेळेची बचत होईल.
-
विद्यापीठांना पुन्हा कागदपत्रांची तपासणी करावी लागणार नाही.
📊 बैठकीतील निर्णय
मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सामाजिक न्याय विभागाची अधिकारी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर वेळेत जमा होण्यासाठी कार्यप्रणाली आखण्याचे निर्देश देण्यात आले.
💡 विद्यार्थ्यांना थेट फायदा
-
शिष्यवृत्ती अर्जासाठी लागणारा वेळ व त्रास कमी होणार.
-
माहिती व कागदपत्रे एकदाच द्यावी लागणार.
-
शिष्यवृत्ती लवकर मिळण्यास मदत होणार.