जळगाव– वड्री विकास सोसायटीची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज वड्री येथे उत्साहात पार पडली. सभेमध्ये ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करताना सोसायटीने खत विभाग सुरू करण्याचा ठराव करण्यात आला. तसेच शासनाकडे बाकी असलेल्या गोडावून भाड्याबाबत मागणी करण्याचेही ठरले.भा सदांनी संस्थेने बँक कर्ज वसुली शंभर टक्के केली याबद्दल संचालक मंडळाचे विशेष कौतुक केले.
या सभेला चेअरमन उमाकांत पाटील, व्हा. चेअरमन रमेश सोना सावळे, सदस्य लीलाधर भगवान चौधरी, उपसरपंच पंकज दिनकर चौधरी, प्रमोद वसंत चौधरी, विलास पंढरीनाथ चौधरी, सुलेमान कान्हा तडवी, सचिन दगडू चौधरी, मुबारक सायबु तडवी, अतुल भागवत भालेराव (व्हा. चेअरमन, खरेदी-विक्री शेतकी संघ यावल), सरवर रुबाब तडवी, मुकुंदा बळीराम महाजन, संचालिका छाया रवींद्र पाटील, रेखा सुनील पाटील, व वड्री गावाचे सरपंच अजय भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
तसेच हाजी शत्रू वजीर, शरद वासुदेव चौधरी, अरमान रमजान तडवी, हुसेन साहेब तडवी, गोविंदा लोटू सुरवाडे, दिनकर धोंडू चौधरी, गोटू ओंकार धनगर, बशीर परमान तडवी, प्रकाश शामराव घुगे, इनुस अब्दुल तडवी, राजू छबु तडवी, प्रभाकर बळीराम सावळे, कमाल कान्हा तडवी, शेख इनुस शेख महमूद, व वड्री-परसाडे गावाचे माजी पदाधिकारी यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी सभेत सहभाग घेतला.