पाल (ता. रावेर) – रावेर तालुक्यातील पाल ग्रामपंचायतीचे तीन सदस्य सलग सहा महिन्यांहून अधिक काळ कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना गैरहजर राहिल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीनल करनवाल यांनी त्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला आहे.
अपात्र ठरविण्यात आलेले सदस्य :
-
मंगला राधेश्याम पवार
-
सरोज मजित तडवी
-
शेख आमीन शेख कादीर
ही कारवाई महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 40 (1)(ब) नुसार करण्यात आली आहे.
उक्त सदस्य 18 ऑगस्ट 2023 ते 21 जानेवारी 2025 या कालावधीत एकाही मासिक सभेला अनुपस्थित राहिले. त्यांच्या गैरहजेरीसंदर्भात कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती.
यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडून वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित सदस्यांकडून कोणताही लेखी खुलासा अथवा उत्तर सादर करण्यात आले नाही. परिणामी ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.