खिर्डी (ता. रावेर) प्रतिनिधी – निंभोरा ग्रामपंचायतीने गावातील सर्व वार्डांत डास नियंत्रणासाठी फवारणी मोहीम सुरू केली आहे. याची सुरुवात वार्ड क्र. ६ (स्टेशन परिसर) येथून यांत्रिक पंपाच्या माध्यमातून करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने संपूर्ण गावात ही मोहीम राबविण्यात येत आहे.
अलीकडच्या दिवसांत बदलत्या हवामानामुळे डेंगू, मलेरिया आदीसारख्या आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. उष्ण व दमट हवामानामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने डास नियंत्रणासाठी पावले उचलली आहेत. दाट लोकवस्ती व पशुपालकांच्या वस्त्यांमध्ये डासांचा त्रास अधिक असल्याचे लक्षात घेऊन फवारणी करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे प्रतिपादन :
“वातावरणातील बदलांमुळे पावसाळ्यात डासांची उत्पत्ती त्रासदायक ठरते. डेंगू, मलेरिया यांसारख्या आजारांपासून गावकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी सुरू केली आहे. नागरिकांनीही स्वतःच्या घर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा.”
– राहुल लोखंडे, ग्रामपंचायत अधिकारी, निंभोरा
छायाचित्रासाठी माहिती :
फवारणी करताना ग्रामपंचायतीचे आरोग्य कर्मचारी