विवरे (ता. रावेर) – शिक्षण विकास मंडळ संचलित श्री. ग. गो. बेंडाळे हायस्कूल, विवरे येथे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, सामान्य रुग्णालय रावेर यांच्या वतीने एचआयव्ही-एड्स जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाच्या आयसीटीसी विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यशाळेत ग्रामीण रुग्णालय, रावेर येथील समुपदेशक महेंद्र सुरवाडे यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही चा संसर्ग कशामुळे होतो, संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी, रोगाची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत मार्गदर्शन केले. तर आयसीटीसी समुपदेशक सुनील महाजन यांनी एड्सविषयी सविस्तर माहिती देत एआरटी केंद्रामधील औषधोपचारांचे फायदे, तपासणी कधी करावी याबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
कलाशिक्षक अर्जुन सोळुंके यांनी विद्यार्थ्यांना एड्सपासून बचावासाठी जनजागृतीपर मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळा शाळेचे मुख्याध्यापक पी. एच. वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक एस. व्ही. येवले यांनी केले. या प्रसंगी पर्यवेक्षक आर. टी. कोल्हे, अर्जुन सोळुंके, विनिता राणे, निलिमा नेमाडे, टी. व्ही. पाचपांडे, प्रतीक वारके तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.