विवरे (ता. रावेर) – रावेर तालुक्यातील विवरे ग्रामपंचायत कार्यालयात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. आगामी नवरात्रोत्सव व इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती.
निभोरा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हरीदास बोचरे यांनी दुर्गोत्सव मंडळांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “गावातील सर्व नागरिकांनी उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडावा.” असे आवाहन केले.
या प्रसंगी सरपंच युनुस तडवी, सदस्य युसुफ खाटीक, पोलिस पाटील, योगेश महाजन, पंकज बेंडाळे, पोहे अमोल वाघ तसेच विवरे बु. आणि विवरे खुर्द येथील मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.