ऐनपूर (ता. रावेर) – गुर्जर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये नवोदय परीक्षा, पाचवी व आठवी शिष्यवृत्ती, एमटीएस, एनटीएस, एनएमएमएस परीक्षेत यश मिळवणारे विद्यार्थी तसेच दहावीत ८५% पेक्षा जास्त, बारावीत ७५% पेक्षा जास्त, पदविकेत ६५% पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेले तसेच विविध क्षेत्रात पुरस्कार प्राप्त समाजबांधवांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात येईल.
पात्र विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिकेची छायांकित प्रत ३० सप्टेंबरपर्यंत गावातील प्रतिनिधींंकडे जमा करून नावे नोंदवावीत, असे आवाहन गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.