पाल (ता. रावेर) – ली. ना. पाटील आश्रम शाळा, पाल येथे आज गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात आली. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यांच्या सूचनेनुसार पाल येथील द. न. वांद्रेकर माध्यमिक आश्रम शाळा आणि ली. ना. पाटील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली.
गोवर-रुबेला या साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आयोजित या मोहिमेत रावेर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल भंगाळे व त्यांची टीम उपस्थित होती. या मोहिमेत दोन्ही शाळांमधील एकूण ४८० विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.
या वेळी द. न. वांद्रेकर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक भागवत पारधी, ली. ना. पाटील आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गोविंदा अत्तर, तसेच नरेंद्र साठे, सविता पाचपांडे, प्रमोद पाटील, कोमल तडवी, वैभव पाटील, जयश्री बराटे, मिलिंद भारंबे, संजय इंगळे, हिरा जावळे आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.