फत्तेपूर – फत्तेपूरजवळील कसबा पिंप्री येथे दहा दिवसांचे बौद्ध धर्म प्रसार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग होता. शिबिरादरम्यान धर्माचे महत्त्व पटवून देण्यात आले.
दहा दिवसांचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी जेवण व भाषणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला सुशील हिवाळे, वसंत लोखंडे, माणिक लोखंडे, नामदेव तायडे, अविनाश सुरवाडे, कुणाल झनके, तेजस घोरपडे, निखिल सुरवाडे, किरण नरवाडे, श्रीकांत सुरवाडे, प्रशिक सुरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.