पाल (ता. रावेर) : येथील कृषी विज्ञान केंद्रात गुरुवारी जागतिक बांबू दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख महेश महाजन यांनी बांबू या वनस्पतीचे महत्त्व स्पष्ट केले. बांबूचा पर्यावरण संरक्षण, बांधकाम, फर्निचर तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेत होणारा उपयोग त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितला.
कार्यक्रमात डॉ. धीरज नेहेते, अतुल पाटील तसेच कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.