केंद्र सरकारनं केलेले नवे GST दर आजपासून (२२ सप्टेंबर) लागू झाले आहेत. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हे बदल लागू करत सर्व वस्तू आणि सेवा मुख्यतः ५% आणि १८% स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या असून, ग्राहकांना याचा थेट फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना या सवलतींचा लाभ घेत खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. चला तर जाणून घेऊया नव्या GST 2.0 चे १० प्रमुख मुद्दे:
-
जीवन विमा पॉलिसी : सर्व प्रकारच्या पॉलिसींना (टर्म, एन्डोव्हमेंट, युलिप) पूर्ण सूट.
-
आरोग्य विमा : वैयक्तिक, फॅमिली आणि वरिष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्यालाही सूट.
-
वाहतूक सेवा : रस्ते वाहतुकीवर ITC शिवाय ५% किंवा ITC सह १८% पर्याय; इकॉनॉमी क्लास फ्लाइटवर ५%, तर बिझनेस क्लासवर १८% GST.
-
लोकल डिलिव्हरी : ई-कॉमर्स मार्गे नोंदणीकृत नसलेल्या सेवा देणाऱ्यांचा जीएसटी भार कंपन्यांवर; ही सेवा १८% स्लॅबमध्ये.
-
औषधं : पूर्ण सूट नाही; ५% GST कायम. कारण – औषध कंपन्यांना इनपुट क्रेडिट उपलब्ध राहावं.





