पुणे : परतीचा मान्सून अजूनही गुजरातमध्ये थांबलेला असल्याने आगामी २२ ते २७ सप्टेंबर या सहा दिवसांत महाराष्ट्रासह बिहार आणि गुजरातमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यांना याचा विशेष तडाखा बसणार असून, १२० ते २०० मिमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून ८ सप्टेंबरपासून पूर्व राजस्थानातून सरकायला सुरुवात झाली असली तरी त्याचा वेग खूपच कमी आहे. दहा दिवसांत तो केवळ गुजरातपर्यंत आला असून, सध्या महाराष्ट्राच्या सीमेवर थांबला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यभरात पावसाचं प्रमाण वाढणार असल्याचं हवामान खात्याचं निरीक्षण आहे.





