मुंबई : भारतीय शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात पडझडीने केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा नियम कडक केले असून, त्याचा थेट परिणाम भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून आला आहे.
सोमवारी (२२ सप्टेंबर) सेन्सेक्स तब्बल ४०० अंकांनी कोसळला, तर निफ्टीही घसरणीसह व्यवहार करत आहे. ट्रेडिंगच्या सुरुवातीला सेन्सेक्स 82,342.47 वर आणि निफ्टी50 निर्देशांक 25,253.95 वर उघडला.
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या TCS, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स लालेतप्त झाले असून, ऑपरेटिंग खर्च वाढल्याने नफ्यावर दबाव येईल अशी गुंतवणूकदारांची भीती आहे.
त्याचवेळी, GST कपातीमुळे FMCG, ऑटो आणि रिटेल क्षेत्रांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे बाजारात क्षेत्रीय चढउतार दिसत आहेत.
आजचे टॉप गेनर्स : SBI लाईफ इन्शुरन्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, श्रीराम फायनान्स आणि एशियन पेंट्स
आजचे टॉप लुजर्स : टेक महिंद्रा, TCS, टाटा मोटर्स, अपोलो हॉस्पिटल्स आणि डॉ. रेड्डीज लॅब्स
बाजारतज्ज्ञांच्या मते, आगामी तिमाही निकाल आणि जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजारातील अस्थिरता पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.





