जळगाव : पहाटेच्या सुमारास महिलेच्या घरात शिरुन तिच्यासोबत अश्लिल वर्तन करत विनयभंग केला. ही घटना दि. २१ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संशयित महेंद्र मराठे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय महिला वास्तव्यास आहे. त्याच गावात राहणाऱ्या संशयित महेंद्र मराठे हा दि. २१ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास महिला राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर गेला. महिला गाढ झोपेत असतांना त्याने महिलेसोबत अश्लिल वर्तन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार महिलेच्या पतीच्या लक्षात येताच, संशयिताने त्यांना तुम्हाला पाहून घेईल, याबाबत कोणाला काही सांगितले तर तुम्हाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. त्यानंतर घराच्या गच्चीवरुन उडी मारुन तो संशयित पसार झाला. दरम्यान, महिलेने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित महेंद्र मराठे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ धनराज गुळवे हे करीत आहे.





