विवरा (ता. रावेर) – दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता परतीच्या पावसाने विवरेसह परिसराला झोडपून काढले. जवळपास तासभर विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
विवरे येथील बाजार चौक, गडारी व परिसरातील नदी-नाल्यांना मोठा पूर आला. अचानक आलेल्या या पावसामुळे गावात पाणी साचले व नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
शेतशिवारातही मोठे नुकसान झाले असून केळी व इतर हंगामी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी वर्ग चिंतेत असून प्रशासनाकडून पंचनाम्याची मागणी होत आहे.





