रावेर तालुका – निंभोरा बु. (ता. रावेर) येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत नवी शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली.
निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी प्रियंका प्रदीप चिमणकारे यांची तर उपाध्यक्षपदी रफिक नुरा पिंजारी यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून करुणा विजय महाले, अनिस हमीद खान, शिरीनबी रफिक खान, किरण अशोक बोरनारे, छाया रवींद्र जोगी, फिरोज युसूफ खान, शितल पंकज कोळी, ग्रामपंचायत सदस्य दिलशाद शेख, शिक्षक तज्ञ भागवत लोटू ठाकरे, विद्यार्थी प्रतिनिधी गुंजन कोळी व मनीषा उमक, शिक्षक प्रतिनिधी मनीषा विनायक चौधरी यांची तर सचिवपदी मुख्याध्यापक पल्लवी राजाराम राणे यांची निवड झाली.
नवीन पदाधिकारी व सदस्यांचे पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन करून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.





