रावेर तालुका प्रतिनिधी – उत्तर प्रदेशातील कानपूर नगर येथे “I LOVE MUHAMMAD” असे लिहिल्याबद्दल २५ मुस्लिम युवकांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या FIR रद्द करण्यासाठी AIMIM रावेर युनिटने भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना तहसील कार्यालयामार्फत निवेदन सादर केले.
निवेदनातील प्रमुख मुद्दे
-
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा:
निवेदनात म्हटले आहे की “I LOVE MUHAMMAD” असे लिहिणे कोणत्याही धर्माचा अवमान नसून श्रद्धा आणि प्रेमाची अभिव्यक्ती आहे. त्यामुळे दाखल केलेले गुन्हे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १९ (अभिव्यक्ती स्वातंत्र्य), अनुच्छेद २१ (जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार) व अनुच्छेद २५ (धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार) यांचे उल्लंघन आहेत. -
कायदेशीर आधार:
निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या मेनका गांधी विरुद्ध यूनियन ऑफ इंडिया, १९७८ या महत्त्वपूर्ण निकालाचा दाखला देण्यात आला आहे. या निर्णयानुसार अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हे लोकशाहीचे प्राण मानले गेले आहे. -
मुख्य मागण्या:
-
सर्व निर्दोष युवकांवरील FIR तातडीने मागे घ्याव्यात.
-
धार्मिक श्रद्धा व अभिव्यक्तीविरुद्ध भविष्यात अशा असंवैधानिक कारवाया होऊ नयेत.
-
राज्यघटनेत दिलेले समानता व धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार सर्व नागरिकांना हमीपूर्वक मिळावेत.
हे निवेदन AIMIM महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुका युनिटने सादर केले. यामध्ये अकबर भाई, शरीफ भाई, सद्दाम भाई, वसीम भाई, मुजाहिद भाई, इमरान, कामिल भाई, शोएब भाई, बबलू भाई, जावेद भाई, जुनैद भाई, शाहरुख भाई, समीर भाई, अकील भाई, सलीम भाई आदींसह AIMIM तालुका युनिटचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनाच्या अखेरीस शासनाने या संवेदनशील प्रकरणात सकारात्मक निर्णय घेऊन राज्यघटनेची प्रतिष्ठा व मर्यादा राखावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.





