जामनेर – भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जामनेर तालुक्यात सेवा पंधरवडा हा कार्यक्रम विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी गुरुवारी सकाळी १० वाजता कसबापिंप्री ग्रामपंचायत कार्यालयात स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका पूर्वमंडळ अध्यक्ष आदरणीय श्री मयूरभाऊ पाटील प्रमुख उपस्थित राहिले. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य तसेच भाजपाचे नवे व जुने पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेण्यात आला. तसेच “अंत्योदय” या त्यांच्या तत्त्वज्ञानावर मार्गदर्शन करून ग्रामस्थांना सामाजिक बांधिलकी व सेवा कार्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.





