नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून मतचोरीच्या आरोपांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक आयोगाला सतत लक्ष्य करत होते. याच पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नवीन नियमानुसार, पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मोजणी सुरू होईल.
यापूर्वी मात्र ईव्हीएममधील मते पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण होण्याआधीच मोजली जात असत.
निवडणूक आयोगाने सांगितले की, हा बदल मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पष्टता सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला आहे.





