जळगाव : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा वक्फ बचाव समितीने वक्फ कायद्याविरुद्ध लढा उभारण्यासाठी विविध आंदोलनांची मालिका राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मौलवी, कार्यकर्ते व बुद्धिजीवींनी सविस्तर आराखडा तयार केला असून, येत्या काही दिवसांत हे कार्यक्रम जळगाव शहरात होणार आहेत.
आंदोलनांचा कार्यक्रम
-
३ ऑक्टोबर २०२५ : जळगाव शहर व जिल्ह्यातील मुस्लिम समाजाची सर्व दुकाने सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहतील.
-
१६ ऑक्टोबर २०२५ : दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदवून मुख्यमंत्री सचिवालयाच्या सचिवांना निवेदन दिले जाईल.
-
२७ ऑक्टोबर २०२५ : दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत जीएस ग्राउंडवर धरणे आंदोलन, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा. दुपारी ३ ते ५ वाजता “जेल भरो” आंदोलन होईल.
-
२ नोव्हेंबर २०२५ : जळगाव शहरात सर्व धर्मातील प्रतिनिधींसह वक्फ कायद्यावर चर्चा करण्यासाठी गोलमेज बैठक.
या सर्व आंदोलनांचा उद्देश वक्फ संपत्तीचे रक्षण करणे आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक व सामाजिक हक्कांना प्रोत्साहन देणे हा आहे. समितीने स्पष्ट केले की हे सर्व कार्यक्रम पूर्णपणे शांततापूर्ण, संवैधानिक आणि लोकशाही मार्गाने पार पडतील.
बैठकीला समिती अध्यक्ष मुफ्ती खालिद व संयोजक फारूक शेख यांनी समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या बैठकीस अनीस शाह, वहिदत शकील सर, अतिक शाह, आयवायएफ मुफ्ती फिज, सईद शेख (लकी फाउंडेशन), अकील शेख, आरिफ देशमुख (एपीसीआर), हाफिज वसीम, मौलाना उमर नासिर, मौलाना कासिम नदवी, साजिद मणियार, मौलाना इम्रान काकर, रज्जाक पटेल, नजमुद्दीन शेख, मौलाना अन्वर भाई, झाकी इद्रिस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.





