यावल : ज.जि.म.वि.प्र.सह समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘स्वच्छता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्याचा भाग म्हणून,आज दिनांक २२ सप्टेंबर २०२५, सोमवार रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत एन.एस.एस. च्या सुमारे दीडशे स्वयंसेवकांनी उत्साहात सहभाग घेतला.
सकाळी ९ वाजता या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. सर्व विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ केला. विद्यार्थ्यांनी कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली, ज्यामुळे महाविद्यालयाचा परिसर पूर्णपणे स्वच्छ आणि सुंदर दिसू लागला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम.सोनवणे आणि उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार उपस्थित होते.या मोहिमेनंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एस.एम.सोनवणे यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. “स्वच्छता ही केवळ आपल्या परिसराची नव्हे, तर आपल्या विचारांची आणि मनाची देखील असावी,”असे ते म्हणाले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याचे कौतुक केले.आणि विद्यार्थ्यांना सांगितले की, “एन.एस.एस.केवळ सामाजिक सेवा शिकवत नाही, तर ती जबाबदारी आणि शिस्तीचे महत्त्वही शिकवते.” उप प्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत या अभियानाला शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पी.व्हि.पावरा आणि महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. आर.एस.शिरसाठ यांनी केले होते.त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व स्वयंसेवकांनी यशस्वीरीत्या ही मोहीम पूर्ण केली.या पंधरवड्यामुळे महाविद्यालयात स्वच्छतेची एक सकारात्मक चळवळ निर्माण झाली आहे.





