फत्तेपूर-जामनेर राज्य मार्ग क्रमांक ४४ व फत्तेपूर-फर्दापूर राज्य मार्ग क्रमांक ४६ वर उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या सहा दुकानदारांविरोधात ग्रामपंचायतीने कारवाईची अंतिम नोटीस बजावली आहे. यापूर्वी तक्रारीनुसार तीन लेखी नोटीस देण्यात आल्या असून, अखेर दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी अंतिम नोटीस देण्यात आली आहे.
मांस विक्री करणाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या जागेतच व्यवसाय सुरू करावा, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता दुकाने सील करण्यात येतील, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.
या कारवाईसंदर्भात तक्रारदार राजेश ओंकार गणबास व इतर ८१ नागरिकांनी उघड्यावर मांस विक्रीविरोधात लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर ग्रामसभेचा ठराव करून दुकानदारांना दि. २५ मार्च, १ एप्रिल आणि ३ मे २०२५ रोजी अनुक्रमे नोटिसा देण्यात आल्या.
अंतीम नोटीस ज्या दुकानदारांना देण्यात आली आहे त्यामध्ये –
* शे. शकील शे. हमीद (सुपर चिकन मटन सेंटर)
* तरबेज खाटीक (न्यू लकी शॉप)
* रईस खाटीक (सुपर चिकन-बकरा मटन)
* सलीम सरदार खाटीक (सुपर चिकन-बकरा मटन)
* अरबाज शकील खाटीक
* जाकीर रशीद खाटीक (अदनान चिकन सेंटर, फत्तेपूर)
ही अंतिम नोटीस गटविकास अधिकारी पं.स. जामनेर, तहसीलदार जामनेर, फत्तेपूर पोलीस स्टेशन तसेच तक्रारदारांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.





