जामनेर – विश्व हिंदू परिषद अंतर्गत दुर्गा वाहिनीच्या वतीने तरुणींसाठी शौर्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन रविवारी जामनेर येथील इंदिरा ललवाणी शाळेच्या आवारात करण्यात आले. या शिबिरात जामनेर तालुक्यातील तब्बल १५५ मुलींनी सहभाग नोंदवला. यावेळी काही बालदुर्गा तसेच मातृशक्तीही उपस्थित होती.
शिबिरात कु. मयुरी चौधरी, कु. आकांक्षा गवळी, कु. आदिती देशपांडे, कु. श्रद्धा मुळे, कु. वैष्णवी सुशीर, कु. पूजा पोळ, कु. कोमल चौधरी व कु. कल्पना बारी यांनी प्रशिक्षण देण्यासाठी मदत केली. मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. श्रीरामजी बर्डे महाराज व डॉ. स्वाती विसपुते यांनी तरुणींना व्यसनमुक्त राहण्याचे आणि चारित्र्य जपण्याचे मार्गदर्शन केले.
शिबिराला माजी नगराध्यक्ष सौ. साधनाताई महाजन, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री भिका इंदलकर, साध्वी सारिका परमानंद दीदी (वृंदावन धाम), साध्वी ऋतुंबरा देवी यांच्या शिष्यांसह अनेक मान्यवरांनी भेट दिली. त्यांनी मुलींना कोणत्याही अमिषाला वा प्रेमप्रकरणांना बळी न पडता संस्कृती जपण्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पदाधिकारी गजानन लोणारी, डॉ. मनोज विसपुते, डॉ. अविनाश कुरकुरे, प्रवीण सुशीर, मयुरी चौधरी, साक्षी महाराज, पूजा पोळ, वैष्णवी सुशीर, अक्षरा हिवराळे यांच्यासह प्रखंडातील अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.





