अमळनेर – शहराजवळील हेडावे रस्त्यावर गुरुवारी (दि. २५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकरूखी येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तिघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर रस्त्याने जाणारे वाहनधारक तात्काळ मदतीला धावून आले आणि जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून जखमीवर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद अद्याप पोलिसांत झालेली नाही.





