यावल – जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि. २५ सप्टेंबर २०२५भारत सरकारच्या निर्देशानुसार , स्वच्छता पंधरवडा व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे ‘एक दिन, एक घंटा,एक साथ राष्ट्र स्वच्छता’ अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या अभियानात महाविद्यालयाचे रासेयो स्वंयसेवकानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या विशेष कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०:३० वाजता मा. श्री.चंद्रकांतदादा पाटील,मंत्री महोदय उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते दूरस्थ दृश्यश्राव्यप्रणालीद्वारे स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली. यावेळी सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि आपल्या भाषणात, ‘स्वच्छता ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. केवळ आपला परिसरच नव्हे, तर आपले विचार आणि आचरणदेखील स्वच्छ असावे,’ असे प्रतिपादन केले.
अभियानांतर्गत महाविद्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्वंयसेवक आणि प्राध्यापकांनी एकत्र येऊन महाविद्यालयाचे मैदान आणि परिसरात सफाई केली. या सामूहिक प्रयत्नांमुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसू लागला.
हे अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसून, स्वच्छतेची ही भावना कायमस्वरूपी जपण्याचे आवाहन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पी.व्हि.पावरा यांनी केले या यशस्वी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजले आणि त्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला.





