विवरे, ता. रावेर – रावेर तालुक्यातील विवरे गावात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ग्रामपंचायतीकडून कोणतीही उपाययोजना न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या पावसाळ्याच्या दिवसांत गावातील विविध ठिकाणी पाणी साचले असून गडारीच्या परिसरात गवताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डासांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मलेरिया, ताप यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून गावात तातडीने डासांची फवारणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.





