यावल – यावल-रावेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल दादा जावळे यांनी पुन्हा एकदा आपल्या साधेपणाने कार्यकर्त्यांची मने जिंकली आहेत. काही कामानिमित्त यावल येथे आले असता त्यांनी बोरवल गेट परिसरातील सुनील कोळी यांच्या चहाच्या टपरीवर अचानक भेट दिली.
या भेटीदरम्यान आमदार जावळे यांनी स्वतः चहा बनवून कार्यकर्त्यांना दिला. नेहमी लोकांमध्ये मिसळून राहणारे आमदार जावळे यांनी या अनोख्या उपक्रमाने कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले.
उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांनी त्यांच्या साधेपणाचे कौतुक केले. “आमदार असूनही ते जमिनीवरचे राहून लोकांशी जिव्हाळ्याने वागतात,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या.
या घटनेचा व्हिडिओ दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटिझन्सकडूनही आमदार जावळे यांच्या साधेपणाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.





