रावेर – जळगाव जिल्हा उपसंपादक अलीम शेख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रावेर लोकसभा जिल्हा बैठक मा. आमदार अनिलदादा पाटील (वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व प्रभारी) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस माजी मंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर, प्रदेश सरचिटणीस रविंद्र नाना पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रा. प्रतिभा शिंदे, सावदा माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे, हारून सेठ, भगतसिंग पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तसेच सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व पक्षाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीतील प्रमुख विषय :
- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीचे नियोजन व चर्चा
- तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांचा आढावा अहवाल
- विविध व्यक्तींचा पक्षप्रवेश
- पक्ष सदस्य नोंदणी अहवाल
- विविध पदांच्या नियुक्त्या
या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्यापक नियोजनासह पक्षबळ वाढविण्यावर भर देण्यात आला.





